सोलापूर : घटनेतील पिडीतेचा पाठलाग करुन तिच्या कॉलेजच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावर अडवून तिच्या मनास लज्जा वाटेल अशी भाषा वापरून छेडछाड केल्याने आरोपी अलीम लतीफ पठाण यांच्या विरोधात फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दि २४/०७/२०१८ रोजी भा.दं.वि कलम ३५४(अ)(ड) ,३४१ सह बाललैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलम ११(४) सह १२ या प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आले. सदर गुन्ह्यांच्या तपास करून फौजदार चावडी पोलिसांनी में. जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र सादर केले.
सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात ॲड निलेश जोशी यांनी सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेल्या साक्षीदारांच्या साक्षीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण तफावती व विसंगती असल्याचे तसेच तक्रारदारांच्या कुटुंबात व आरोपी यांच्यातील वैयक्तिक वादाचा बदला घेण्यासाठी काल्पनिक व खोटी घटना घडल्याचे दाखवून खोटी फिर्याद आरोपी विरुद्ध दिली असल्याचे मे. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच सरकार पक्षाने आरोपी विरुद्ध सबळ व ठोस पुरावा में. न्यायालयात आणलेला नसल्याचे निदर्शनास आणून दिले.
आरोपीच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. पी. आव्हाड यांनी आरोपी अलीम लतीफ पठाण याची निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपीच्या वतीने ॲड. निलेश जोशी, ॲड. यशश्री जोशी, ॲड. मल्लिनाथ बिराजदार, ॲड. पैगंबर सय्यद, ॲड. राणी गाजूल, ॲड. ओकार परदेशी यांनी काम पाहिले.


















