सोलापूर : वाढदिवसास फेटा, शाल, हार, गुच्छ़, बुके न आणता वह्या आणा असे पृथ्वीराज माने यांनी केलेल्या आवहानास कार्यकर्त्यांनी वह्या व शालेय साहित्य़ देऊन अनोख्या शुभेच्छा दिल्या तर अनेक गावात विविध उपक्रम राबवण्यात आले.
युवकांचे उच्च़शिक्षीत नेतृत्व़ पृथ्वीराज माने यांच्या वाढदिवसास शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यातील व शहरातील कार्यकर्त्यांनी सुमित्रा निवासस्थानी मोठी गर्दी केली. याशिवाय, अजय सोनटक्के मित्र मंडळाचे वतीने वृक्षारोपन, शालेय विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप, नरोटेवाडी येथे वृक्ष वाटप करण्यात आले. तर गतवर्षी वाढदिवसास वृक्ष लागवड केलेल्या वृक्षाची सद्यस्थितीचे फोटोही कार्यकर्त्यांनी कौतुकाने आणले.
यावेळी बाबासाहेब पाटील, रजनी भडकुंबे, नंदकुमार अंत्रोळीकर, विकास पाटील, आप्पासो काळे, गंगाधर बिराजदार, चंद्रकांत खुपसंगे, नागेश म्हेत्रे, राहूल जाधव, विशाल ताकमोगे, नितीन भोपळे, नानासो पवार, सिध्देश्वर काळे, भास्क़र सुरवसे, चंद्रकांत कुलकर्णी, आण्णा भोपळे, केतन शहा, उमेश ऐनापूरे, संजय निचाणी, पप्पू साखरे, विनोद हावळे, नेताजी सुरवसे, नागनाथ माने, अविनाश मार्तंडे, अरुण बारसकर, कलीम तुळजापुरे, संभाजी भडकुंबे, तानाजी भोसले, मुरलीधर शिंदे, दत्तात्रय पवार, निखील भोसले, अजित माने, निखील देशपांडे, युवा मंच पदाधिकारी, माने परिवारातील संस्थेचे परिवार सदस्य़, याशिवाय उत्तऱ सोलापूर, दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर व जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















