सोलापूर : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रचंड ताणले. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना तारळकर यांना उत्तरे देता आले नाहीत सर्व आमदारांसमोर जेव्हा क्रीडा अधिकारी उघडे पडले तेव्हा पालकमंत्र्यांनी आमदारांच्या कमिटी कडून त्यांच्या कारभाराची चौकशी लावली आहे.
आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपल्या मतदारसंघातील क्रीडा संकुलाचा विषय उपस्थित केला. 22 वर्षे झाले क्रीडा संकुल मंजूर आहे, आज पर्यंत कंपाउंड भिंत तरी बांधली आहे का हे विचारा बांधण्यात आली. तीन वर्षापासून निधी आला मात्र निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वितरित करण्यात आला आहे मात्र अद्यापही क्रीडा संकुलाचे काम सुरू झालं नाही. निकृष्ट दर्जाच्या क्रीडा साहित्याची खरेदी झाली 14 कोटीचा निधी गेला कुठे? याची चौकशी करण्याची मागणी आमदार देशमुख यांनी केली.
पालकमंत्री विखे पाटील यांनी क्रीडा अधिकारी नितीन तारकर यांना अनेक प्रश्न केले सोलापूर जिल्ह्यामध्ये किती अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू आहेत? जिल्ह्यात किती खेळाडूंना छत्रपती शिवाजी पुरस्कार मिळाला आहे? किती लोकांना खेल रत्न पुरस्कार मिळाला? किती खेळाडू राज्यपातळीवर खेळले?, किती खेळाडू राष्ट्रीय पातळीवर गेले? कोण कोणत्या तालुक्यात क्रीडा समितीची बैठक घेतली ?असा एक तालुक्याचे उदाहरण सांगा, जिल्ह्याचे क्रीडा धोरण काय केले? असे अनेक प्रश्न पालकमंत्र्यांनी उपस्थित केले यामुळे क्रीडा अधिकाऱ्यांची भांबेरी उडाली तारळकर यांनी मंगळवेढा म्हणताच मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांनी मात्र मी त्यांना आजच पाहिले असे म्हणताच सभागृहात एकच अशा पिकला.
आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा आणि पंढरपूर या तालुक्यात क्रीडा संकुल बांधण्याबाबत अनेक वेळा सूचना केल्या मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची नाराजी व्यक्त केली.
आमदार राम सातपुते यांनी क्रीडा अधिकारी तारकर यांच्याकडे माळशिरस तालुक्याचे क्रीडा धोरण काय अशी विचारणा केली असता मिटींग असल्याचे सांगून माहिती देण्यास टाळाटाळ केल्याची तक्रार केली. आमदार राजेंद्र राऊत यांनीही त्यांच्या कामचुकारपणाची तक्रार केली, क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत कोणते साहित्य वाटतात हे आजपर्यंत कुणालाही समजले नाही. एकूणच आमदारांची नाराजी पाहता क्रीडा अधिकारी नितीन तारकर यांचे क्रीडा धोरण त्यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी सर्व आमदारांची चौकशी समिती पालकमंत्री विखे पाटील यांनी नेमली आहे.



















