सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक 1 चे नंबर वन फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद सोलापूरच्या मुलींसाठी सुरू केलेल्या सायकल बँकेस सोलापूरचे नूतन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते दक्षिण, उत्तर सोलापूर, तालुक्यातील मुलींना प्रातिनिधीक स्वरूपात 11 सायकली प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, इशाधीन शेलकंदे, कार्यकारी अभियंता पंडीत भोसले, शिक्षणाधिकारी माध्यमिक भास्करराव बाबर, संजय जाविर, गट विकास अधिकारी दक्षिण सोलापूर बाळासाहेब वाघ , गटविकास अधिकारी प्रशांत काळे गटशिक्षणाधिकारी दक्षिण सोलापूर म्हलारी बनसोडे, उत्तर सोलापूर बापूसाहेब जमादार, उत्तम सुर्वे उपस्थित होते.
याप्रसंगी चेरमन हरिबा सपताळे यांनी पालकमंत्री यांचे शाल व प्रतिमा देऊन सन्मानित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ संचालक विवेक लिंगराज यांनी केले. विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना पुष्प देऊन मंत्री महोदयांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी तज्ञ संचालक डॉ. एस. पी .माने ,ज्येष्ठ संचालक श्रीशैल देशमुख, शहाजान तांबोळी, दीपक घाडगे, दत्तात्रय घोडके ,सुहास चेळेकर ,अनिल जगताप ,शेखर जाधव, सुंदरराव नागटिळक, विष्णू पाटील, सुखदेव भिंगे, मृणालिनी शिंदे ,सुनंदा यादगिरी, त्रिमूर्ती राऊत संचालक व दत्तात्रय देशपांडे सचिव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार धन्यकुमार राठोड यांनी मानले .कार्यक्रमाचे यशस्वीेतेसाठी सुभाष काळे, विनोद कदम, अशोक पवार नितीन येमुल आदींनी परिश्रम घेतले.





















