पंढरपुर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी माजी केंद्रीयगृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची त्यांच्या सात रस्ता इथल्या जनवात्सल्य निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन विविध विषयावरती सखोल चर्चा केली.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, विठ्ठलचे मार्गदर्शक बी पी रोंगे, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यावेळी उपस्थित होते.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून अभिजीत पाटील यांनी राजकीय लक्ष वेधून घेतले आहे. मंगळवेढा पंढरपूरचे भावी आमदार म्हणून अभिजीत पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे. अभिजीत पाटील यांचे भारतीय जनता पार्टी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. एकीकडे असे असताना अभिजीत पाटील यांनी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची घेतलेली भेट हे नव्या राजकीय चर्चेला तोंड फोडणारी आहे.



















