सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे प्रथमच सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सोलापूर शहरात येण्यापूर्वी त्यांनी पंढरपूर मध्ये मुक्काम केला. सकाळी नऊच्या दरम्यान ते श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणार होते.
परंतु, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हेही सोमवारी सोलापूर दौऱ्यावर होते त्यांनी सोलापुरात मुक्काम केल्यानंतर ते सकाळी पंढरपूरला श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी गेले. चंद्रकांत दादा येत असल्याची माहिती कळताच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील काही वेळ थांबले.
दोन्ही नेत्यांनी एकत्रित जाऊन श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने दोन्ही मंत्री महोदय यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार राम सातपुते यांची उपस्थिती होती.


















