सोलापूर : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मोहोळ येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात हनुमान चालीसा वरून नाव न घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व खासदार नवणीत राणा यांच्यावर तोफ डागली. कुणी उठायचे भोंगे उतरा, कुणी म्हणायचे भोंगे चढवा, आमची हनुमान चालीसा म्हटल्याशिवाय सकाळ होत नाही. आता हे “नवनिर्माण आणि नवणीत”…., नवनिर्माण म्हणतंय आम्ही मशिदीसमोर हनुमान चालीसा म्हणणार, नवनीत म्हणतात आम्ही मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणणार, अरे ही हनुमान चालीसा मातोश्रीवर नाही,मशिदीवर नाही तर मारुती मंदिरात मारुतीला प्रसन्न करण्यासाठी म्हटली जाते, आता बस करा, जातीचे राजकारण नाही तर हे संकटमोचक कधी संकट म्हणून तुमच्या मागे लागेल हे कळणार नाही. पहा काय म्हणाले धनंजय मुंडे…


















