सोलापूर – माढा तालुक्यातील भुताष्टे गावात दोन मजुरांना त्यांच्याच मुकादमाने जबर मारहाण केली आहे. त्या मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावरून समोर आला आहे. दोघा मजुरांचे हातपाय बांधून ठेकेदाराकडून अमानुषपणे मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहून संताप व्यक्त केला जात आहे. माढा पोलीस ठाणे येथे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनाली विकास नाईकवडे यांच्या फिर्यादी वरून बालाजी मोरे,भालचंद्र अनंत यादव व इतर अनोळखी दोघांवर असे एकूण चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास नाईकवडे व सेवक कसबे असे जखमी मजुरांचे नाव आहे. त्यांच्यावर खाजगी व सरकारी दवाखान्यात प्रथमोपचार करण्यात आले आहे. हा प्रकार 15 ऑगस्ट रोजी माढा तालुक्यातील भुताष्टे या गावात घडला आहे. 17 ऑगस्ट रोजी याबाबत माढा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


















