आरोपींची नांवे:-
1) गोविंद सरदार काळे वय 24 वर्ष,
2) अप्पा बाळू पवार वय 58 वर्ष दोघे रा. कारंबा ता. उत्तर सोलापूर
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर ग्रामीण जिल्हयाचा पदभार स्विकारल्यानंतर सोलापूर ग्रामीण जिल्हयातील दरोडा व जबरी चोरी, घरफोडी व चोरी इत्यादी सारख्या मालाविषयी गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याकरीता आढावा घेवून त्यामध्ये जिल्हयातील रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार व विशेष जनावर चोरीच्या गुन्हयातील आरोपींना पकडून कारवाई करण्याबाबत एल.सी.बी चे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना आदेशित केले होते. त्याप्रमाणे एल.सी.बी. कडील सपोनि रवींद्र मांजरे व त्यांचे पथकास नेमले होते.
गुन्हे शाखेचे सपोनि रवींद्र मांजरे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशिर बातमी मिळाली की, मौजे कारंबा ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर येथील काही इसम हे टेम्पो व इंडिका कार मधून मोहोळ, अक्कलकोट, तालुका उत्तर सोलापूर इत्यादी भागामध्ये घरफोडी व जनावर चोरी करण्याकरीता जात असलेबाबत माहिती मिळाली होती. या बातमी प्रमाणे कारवाई करणे करीता सपोनि मांजरे यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना कळविले असता त्यांनी तात्काळ सपोनि मांजरे व त्यांचे पथकास योग्य त्या सूचना देवून कारवाई करण्यास सांगितले.
सपोनि रवींद्र मांजरे व त्यांचे पथक कार्यालयात हजर असताना त्यांना संशयित इसम हे सकाळी सोलापूर शहर येथील पार्क चैकात येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली. मिळालेल्या बातमी प्रमाणे सपोनि मांजरे व त्यांचे पथक पार्क चैकात सापाळा लावला असता बातमी प्रमाणे 02 इसम हे पार्क चैकात आले त्यांना ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या इसमांना पोलिसी हिसका दाखवला असता त्यांनी त्यांचे इतर साथिदारामार्फत मौजे बाणेगांव ता. उत्तर सोलापूर येथील बंद असलेल्या कारखान्याचे कुलुप तोडून कारखान्यातून म्युझिक सिस्टिम, इन्वेटर बॅटरी, ऑफिस खूर्ची, पन्हाळी पत्रे, मोटार, वायर बंडल, व इतर साहित्य चोरी केल्याचे सांगून गुन्हयातील मुद्देमाल काढून दिला आहे. तसेच मौजे कारंबा शिवारातील शेतातील बंद घराचे कुलुप तोडून त्यातील एक म्हैस व रेडकी चोरून दोन्ही जनावरे मौजे शिरनाळ ता. विजापूर जि. विजापूर राज्य कर्नाटका येथे विकले असल्याचे सांगितले आहे. मौजे कासेगांव शिवारातील एक रेडा आरोपीतांनी चोरून तो कापून खाल्ले असल्याचे सांगत आहे. तसेच अक्कलकोट येथील एक बंद घराचे कलूप तोडून घरफोडी चोरी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केले असल्याचे सांगत आहे.
तरी ताब्यातील इसमांनी त्यांचे इतर साथिदारामार्फत मिळून वरील प्रमाणे गुन्हे केले असल्याचे सांगत असून त्याप्रमाणे खालील पोलीस ठाणेस गुन्हे दाखल आहेत.
1) सोलापूर तालुका पो.स्टे गुरंन 300/2021 भादविकाक 457,380 प्रमाणे दाखल आहे.( बानेगांव)
2) सोलापूर तालुका पो.स्टे गुरंन 173/2021 भादविकाक 457,380 प्रमाणे दाखल आहे. (कारंबा)
3) सोलापूर तालुका पो.स्टे गुरंन 240/2021 भादविकाक 379 प्रमाणे दाखल आहे. ( कासेगांव )
4) अक्कलकोट उत्तर पो.स्टे गुरंन 403/20 भादविकाक 454,457,380 प्रमाणे दाखल आहे.(अक्कलकोट)
या दोन्ही इसमांना सोलापूर तालुका पोलीस ठाणेच्या ताब्यात दिले असून ते सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत. त्यांचेकडून आणखीन जनावरे चोरी व घरफोडीचे गुन्हयांची उकल होण्याची शक्यता आहे. या टोळीमधील एक इसम हा केंद्र सरकारचा कर्मचारी असून तो रेल्वे मध्ये कामास आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सपोनि रवींद्र मांजरे, सफौ. खाजा मुजावर, पोलीस हवालदार/ नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अक्षय दळवी, चालक समीर शेख, महिला पोलीस अंमलदार मंजूळा धोत्रे व अनिसा शेख यांनी बजावली आहे.



















