सोलापूर,दि.27-निराळे वस्ती येथील रहिवासी पत्रकार माधव किसन येच्चे (वय 37) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी,एक मुलगा असा परिवार आहे .त्यांची अंत्ययाञा गुरुवार सकाळी 11 वाजता त्यांच्या राहात्या घरापासून निघणार आहे. पत्रकार माधव हे यापूर्वी वृत्तवेध न्यूज चॅनल, इन सोलापूर न्यूज चॕनेलचे याठिकाणी सेवा केली आहे. सोलापूर शहरात क्राईम रिपोर्टर म्हणून त्यांची चांगली ओळख होती. ‘संचार’चे उपसंपादक नंदकुमार येच्चे यांचे ते मोठे बंधू होत.

















