सोलापूर : माजी आमदार दिलीप माने यांनी शेकडो शेतकऱ्यांच्यासह सोमवारी जिल्हा नियोजन भवन या ठिकाणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन बराच वेळ चर्चा केली.
संभाजी भडकंबे, आप्पासाहेब काळे ,गंगाधर बिराजदार, चंद्रकांत कुलकर्णी , चंद्रकांत खुपसंगे, विकास पाटील, सचिन गुंड ,वैजनाथ गवळी ,भारत भोसले, शिवाजी पाटील ,भास्कर सुरवसे नेताजी सुरवसे ,चंद्रकांत शिंदे ,ज्ञानोबा साखरे, मधुकर माने, शिवा व्हाेसाळे, प्रमोद शिंदे, अजय सोनटक्के, राजकुमार शिंदे, सुनील जाधव, इंद्रजित लांडगे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामध्ये दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यात अतिवृष्टी झाली असून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी, जनावरावरील लंपी रोगाची लस लवकरात लवकर द्यावी, सोलापूर ते होटगी रोडची दुरुस्ती करावी अशा मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. दरम्यान माने यांनी अधिक माहिती दिली….




















