सोलापूर- सोलापूर शहरातील रहदारीचे रस्ते तातडीने डांबरीकरण करा तसेच सोरेगाव मलनिस्सारण पाणी प्रश्न त्वरीत सोडवा या मागणीसाठी माजी आमदार दिलीप माने यांनी सोलापूर महापालिकेत आयुक्त पी शिवशंकर यांची भेट घेतली होती.
यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी 1 सप्टेंबर रोजी महानगरपालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा दिला. माने यांच्या मागणीची दखल घेत महापालिका प्रशासनाने आसरा ते डिमार्ट हा रस्ता रातोरात डांबरीकरण करण्याचे काम सुरु झाले आहे. दरम्यान जुळे सोलापूर भागातील दिलीप माने समर्थकांनी महापालिकेच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
दरम्यान याप्रकरणी माने यांची प्रतिक्रिया घेतली असता रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम जरी सुरू झाले असले तरी आपण 1 तारखेच्या उपोषणावर ठाम आहोत असे त्यांनी सांगितले.



















