उत्तर सोलापूर : तालुक्यातील बारा ग्रामपंचायतची निवडणूक लागली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, माजी आमदार दिलीप माने या दोन नेत्याचे गट अतिशय स्ट्रॉंग आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांचाही गट आता सक्रिय झाल्याचे पाहायला मिळतं.
तालुक्यातील गावडे दारफळ ग्रामपंचायतच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाले आहे. एका बाजूला माजी आमदार दिलीप माने व कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांचा पॅनल निवडणूक रिंगणात आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांचे समर्थक असलेल्या कल्याण काळे यांचा पॅनल स्वतंत्र निवडणूक लढवत असून त्यांनी आपल्या सरपंच पदासह 9 उमेदवारांचे अर्ज शुक्रवारी शेवटच्या दिवशी दाखल केले. यावेळी
कल्याण काळे, नागेश पवार, शिवाजी पवार, सुधाकर पवार, परमेश्वर थिटे, भारत माळी, विठ्ठल घोलप, शांताराम लोंढे, महानंदा लोंढे, विनोद घोलप यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान नागेश पवार यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांच्या विचारांचा हा पॅनल असून उमेश पाटील व दिलीप माने यांच्या गटांना धोबीपछाड करून या निवडणुकीत विजय मिळवेल असा दावा केला.



















