सोलापूर – माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसास सोलापूर शहर,उत्तर सोलापूर,दक्षिण सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी शुभेच्छाचा वर्षाव केला. तर रक्तदान शिबीर, वृक्षारोपन, शालेय साहित्य वाटप,आदि उपक्रम कार्यकर्त्याकडून गावोगावी राबवण्यात आले तर हार, गुच्छ़ नको या आवहानास मोठा प्रतिसाद देत अनेकांनी शालेय साहित्य शुभेच्छा म्हणून दिले.
होटगी रोड येथील सुमित्रा निवास येथील बंगल्यावर माजी आमदार दिलीपराव माने यांच्या वाढदिवसास शुभेच्छा देण्यासाठी पावसात देखील मोठी गर्दी केली. गावोगाव व शहरी भागातील कार्यकर्ते आपल्या कार्यकर्त्यासह भेटून शुभेच्छा देत होते. शावरु वाघमारे व युवराज चव्हाण मित्र परिवाराने क्रेनचे सहाय्याने 162 किलो फुलाचा हार घालून प्रेम व्यक्त़ केले. तर पृथ्वीराज माने युवा मंच, परिवारातील संस्था, विविध संघटनेने शुभेच्छा वर्षाव केला. हार, गुच्छ़ नको… वही पेन दया या आवाहनास देखील मोठा प्रतिसाद मिळाला.
मजरेवाडी, कुमठे, भोगांव, वडापूर, निबर्गी, सादेपूर, माळकवठे, येथे 769 जणांनी रक्तदान केले. गुंजेगांव येथे 200 विदयार्थ्यांना शालेय बॅग, शंकरनगर येथे वृध्दांना काठी, तर नान्नज़, साखरेवाडी, भागाईवाडी, कौठाळी, गा. दारफळ, खेड,भोगांव, बाणेगाव, मार्डी, एकरुख, हगलूर, कारंबा, बेलाटी, पाथरी, प्रतापनगर, सोरेगांव, कुमठा नाका, आदि गावांना डोणगांव, तिऱ्हे, कोंडी, कारंबा, दारफळ गा. गावात वृक्षारोपन करण्यात आले.
यावेळी भारत जाधव, संतोष पवार, तौफीक शेख, अनंत चंदनशिवे, सुनिता शेटे, गणेश वानकर, सुरेश हसापुरे, राजन जाधव, दिपक माळी, शिवलिंग कांबळे, भारत बडूरवाले, अनंत जाधव, अलका राठोड, शैलजा राठोड, विनोद भोसले, प्रविण डोंगरे, जॉन फुलारी, आरीफ शेख, राजकुमार हंचाटे, चंद्रकांत
रमणशेट्टी, प्रमोद गायकवाड, नागेश ताकमोगे, केदार उंबरजे, समीर शेख, जितेंद्र साठे, प्रकाश चोरेकर, इटकळे, अविनाश मार्तडे, राजू सूपाते, दत्ता मुळे, परमानंद अलंगोडा, शिवानंद पाटील, आप्पासो काळे, निखील देशपांडे, चंद्रकांत खूपसंगे, श्रीकांत मेलगे-पाटील, प्रथमेश पाटील, राजू अक्कलवाडे, सागर माने, सचीन गुंड, सिध्देश्वर काळे,संभाजी भडकुंबे, सोमनाथ राऊत यांचेसह ब्रह्रमदेवदादा माने आशीर्वादीत संस्था कर्मचारी, पृथ्वीराज माने युवा मंच,पार्क चौक व्यापारी मंडळ,पदाधिकारी, पत्रकार बंधू मोठया संख्येने उपस्थित होते.








































