सोलापूर : आपल्या जीवनामध्ये दिनदर्शिका या मार्गदर्शक आणि दिशादर्शक असतात. दिनदर्शिकेवर जीवनाचे नियोजन ठरते. म्हणूनच आयुष्यात दिनदर्शिकेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले.
सोलापूर जिल्हा पतसंस्था क्रमांक दोन च्यावतीने यशवंतराव चव्हाण सभागृहात सन 2023 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे, नूतन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, कार्यकारी अभियंता कुलकर्णी, पतसंस्थेचे चेअरमन श्रावण मोरे, व्हाईस चेअरमन श्रीकांत घोडके यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर, कॅफो पवार, कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांनी पतसंस्थेच्या कार्याचा गौरव करत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी गिरीश जाधव यांनी प्रास्ताविकात पतसंस्थेच्या कार्याचा आढावा सांगितला.
यावेळी मॅनेजिंग डायरेक्टर गिरीश जाधव, संचालक रणजीत घोडके, सुधाकर माने देशमुख, युवराज जाधव, सुनंदा जाधवर, राणी सुतार, श्रीकृष्ण घंटे, इंदुबाई म्हेत्रे, विलास माने, विजया राऊत आदीसह जिल्हा परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















