सोलापूर : सोलापूर शहरातील ज्येष्ठ राजकीय नेते महेश कोठे यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे यांचा विवाह सोहळा रविवारी मोठ्या थाटात हजारोंच्या उपस्थितीत संपन्न झाला. वधू श्रुतिका अंबादास राजुल यांच्यासोबतीने प्रथमेश यांनी सहजीवनाची गाठ बांधली.
दुपारी 12 वाजून 16 मिनिटांच्या शुभमुहूर्तावर गंगाई केकडे नगर येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कुलच्या भव्य प्रांगणात पार पडला.
या लग्न सोहळ्यासाठी भव्य असा शामियाना मंडप उभारण्यात आला होता. जवळपास सहा ते सात हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था होती. यासह उपस्थितांच्या भोजनाची व्यवस्था अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आली होती. व्हीआयपी सेक्शन स्वतंत्र होते. कोठे परिवाराच्यावतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात येत होते.
या लग्न सोहळ्याला सोलापूर शहर जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील दिग्गज राजकीय नेते उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ नेत्या उज्वला शिंदे, सोलापूरचे माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार प्रणिती शिंदे, आमदार यशवंत माने, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम, सिद्धेश्वर कारखान्याचे संचालक धर्मराज काडादी, माजी मंत्री मधुकर चव्हाण, संतोष पवार, तौफिक शेख, फारूक शाब्दी, प्रकाश वाले, सुधीर खरटमल, आनंद चंदनशिवे, शेखर माने, आरिफ शेख, चेतन नरोटे, संजय हेमगड्डी, अमोल शिंदे, प्रा.शिवाजी सावंत, श्रीकांचना यन्नम, विद्या लोलगे, माजी आमदार धनाजी साठे, महेश गादेकर, भारत जाधव, किसन जाधव तसेच सोलापूर महापालिकेचे आजी माजी पदाधिकारी माजी नगरसेवक तसेच इतर प्रमुख पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व पाहुण्यांचे महेश कोठे व देवेंद्र कोठे यांनी स्वतः आलेल्या मान्यवरांचे स्वागत करत होते. अतिशय नेटके नियोजन कोठे परिवाराच्या वतीने करण्यात आल्याचे पहायला मिळाले.
























