भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीपणामुळे अनेक जाती, धर्म असूनही भारत देश हा एक संघपणे राहतोय याचे संपूर्ण श्रेय जगातील आदर्श अशा संविधानाला आहे असे प्रतिपादन गट विकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांनी केले. ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम प्रंसगी बोलत होते.
बाबासाहेबांनी समाजातील सर्वच घटकांसाठी विशेषतः दीनदलित, वंचित महिलांसाठी त्यांचे कार्य अनन्यसाधारण आहे. फुले, शाहू, आंबेडकर विचारांचा वारसामुळे समानतेचे तत्व महाराष्ट्रात पुरोगामी पद्धतीने प्रचलित आहे . बाबासाहेबांचे हिंदु कोड बिल माध्यमातून महिलांच्या उन्नतीसाठी केलेले काम अतुलनीय असून त्यांचे कार्य हे देशासाठी अजरामर आहे अशा भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे यांनी बाबासाहेबाना अभिप्रेत विचार प्रत्यक्ष कृतीत आणून आपणास सेवा करण्याची संधी आहे ती केल्यास खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल असे प्रतिपादन केले.
पंचायत समिती दक्षिण सोलापूर वतीने विसावा सभागृह येथे पंचायत समिती दक्षिण सोलापूर मधील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत आदरांजली कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमास डॉ. दिंगबर गायकवाड, उपअभियंता विलास भोसले, रविशंकर बोधले, आदी उपस्थित होते सर्व कर्मचाऱ्यांनी बुद्ध वंदना व पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. बुद्ध वंदना संघर्ष लोंढे यानी तर भिमगीत सूरज ओहळ यानी म्हंटले.
कार्यक्रमांचे प्रास्ताविक साह्य प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज, सूत्रसंचालन सूरज ओहळ, तर आभार प्रदर्शन नागसेन कांबळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आप्पासाहेब गायकवाड, तजमुल मुतवली, विक्रम शहा, कैलास जींदे, सुनिता लांबतुरे, निर्मला राठोड, रीमा पवार, बाळासाहेब मम्हाने, नरेन्द्र सर्वदे, शांता जाधव, अश्विनी बिराजदार, पूनम नर्सोडे, भिमशंकर वाले, विनायक कूंचपोर, सविता गुरव, महेश इटकर आदींनी परिश्रम घेतले.




















