सोलापूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर झेंडा उपक्रमाच्या तिरंगा झेंडा विक्री व वितरणाचा शुभारंभ दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, हर घर तिरंगा उपक्रमाच्या नोडल अधिकारी चारुशीला देशमुख, प्रांताधिकारी सुजित शिंदे, तहसीलदार अमोल कुंभार, दक्षिणचे गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, नायब तहसीलदार शुभांगी जाधव, नायब तहसीलदार गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या हस्ते तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर आणि चारुशीला देशमुख यांनी हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत येत्या 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा असे आवाहन केले….
तहसील कार्यालयाच्या बाहेर बसवण्यात आलेल्या सेल्फी पॉईंट मध्ये स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी तिरंगा झेंडा हातात घेऊन फोटो काढत उत्साह वाढवला.


























