सोलापूर : ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सोमवार 5 डिसेंबर हा दिवस उमेदवारी अर्ज छाननीचा असल्याने सर्व उमेदवार व त्यांचे वकील अशी मोठी गर्दी दिसून आली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची अर्ज छाननी नार्थकोट प्रशालेत सुरू आहे.
वांगी ग्रामपंचायत सरपंच पद हे अनुसूचित जमाती स्त्री साठी राखीव आहे. सीता लक्ष्मण खडाखडे यांच्या विरोधात सोनाबाई रामा खडाखडे या उमेदवार आहेत. सीता लक्ष्मण खडाखडे यांनी सोनाबाई खडाखडे यांच्या विरोधात हरकत घेतली असून जात पडताळणी समिती कार्यालयाची आणलेली होत पावतीही चुकीची असल्याचे हरकतीत म्हटले आहे. याबाबत सुरज खडाखडे यांनी अधिक माहिती दिली.



















