सोलापुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भारत जाधव यांच्या अध्यक्षेतेखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी हॉटेल लोटस येथे एकत्रित बैठक घेऊन सकारात्मक चर्चा केली. यापुढे कोणताही वाद न वाढविता दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी “हातात हात घालुन” महाविकास आघाडीच्या वतीने भाजपच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध लढण्याचा निर्धार व्यक्त केला.
यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी जनवात्सल्य निवासस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेऊन चाय पे चर्चा करत दोन्ही पक्षातील गोडवा वाढविला. यामध्ये विशेष करून तौफिक शेख यांनी लक्ष वेधले 2014 साली काँग्रेस सोडल्यानंतर शेख हे एमआयएम पक्षात गेले होते सुमारे सात वर्षानंतर ते जनवात झाल्यावर दिसून आले.
यावेळी सोलापुर शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष भारत जाधव, काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, प्रदेश चिटणीस किसन मेकाले, मा. नगरसेवक आरिफ शेख, माजी नगरसेवक तौफिक शेख, प्रवीण निकाळजे, विनोद भोसले, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, माजी युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, राष्ट्रवादीचे नेते मंडळी शंकर पाटील, शफी इनामदार, जनार्दन कारमपुरी, तौफीक शेख, प्रमोद गायकवाड, जुबेर बागवान, अँड केशव इंगळे, शकील मौलवी, तिरुपती परकीपंडला, सुशील बंदपट्टे, श्रीकांत वाडेकर, शरद गुमटे, सुनील सारंगी यांच्यासह दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.




















