सोलापूर – अनेक झाडांच्या फांद्या खांबावरील विद्युत तारेत घुसलेल्या असतात. पावसाळ्यात अशा फांद्या तोडण्याचे काम महावितरण कडुन राबविले जाते. फांद्यांना तारा घासुन तारा तुटुन मनुष्य व मालमत्तेची हानी होऊ शकते ती रोखण्यासाठी ही मोहिम जरुरीची असतेच.
विजापुर वेस एका एटीएम जवळील गुलमोहर झाडाच्या धोकादायक फांद्या महावितरण मंडळ कर्मचारींनी तोडल्या . एका फांदी कावळ्याचा संसार घरटे होते. चार पिल्ल जी लवकरच निसर्गात उडण्यासाठी योग्य होणार होती ती रस्त्यावर पडली.
घटनेची माहिती वाईल्ड लाईफ केअर सोलापूर संस्थास फोनद्वारे समजली. संस्था सदस्य प्रविण जेऊरे , तेजस म्हेत्रे घटनास्थळी पोहचले. पडलेले कावळ्याचे घरटे पुन्हां त्याच झाडावर काही फुट सुरक्षीत उंचीवर चार पिल्लासह बांधले. पिल्लांच्या मातापित्यास घरट्याची बदलेली जागा समजताच थोडावेळाने ते सुद्धा घरट्यावर येऊन बसले.





















