संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल देवी मोहिते-पाटील स्वरूपा राणी मोहिते पाटील अरुण तोडकर गणेश पाटील सुनंदा फुले मंगल वाघमोडे या सहा सदस्यांचे जिल्हा परिषद सदस्य पद रद्द करण्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीमध्ये या सहा सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा व्हीप डावलून भाजप समविचारी आघाडीच्या उमेदवाराला मतदान केले होते त्यामुळे यांचे सदस्य पद रद्द करावे अशी तक्रार आहे या प्रकरणात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बुधवार 24 मार्च ही तारीख दिली होती चार वाजता सुनावणी होती सहा सदस्यांपैकी केवळ अरुण तोडकर व गणेश पाटील दोघे सदस्य हजर होते राष्ट्रवादी काँग्रेस कडून जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे हे हजर होते जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी साडेचार वाजता सुनावणीला या सर्वांना आपल्या चेंबरमध्ये बोलावले मात्र केवळ दहा मिनिटातच सर्व जण बाहेर आले साठे यांचे वकील एडवोकेट उमेश मराठे तसेच एडवोकेट बाबासाहेब जाधव यांनी माहिती देताना या प्रकरणात सदस्य यांचे वकील एडवोकेट दत्ता घोडके हे आजारपणाने गैरहजर आहेत तेच युक्तिवाद करणार असून पुढील तारीख यावी असा अर्ज दिला त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पाच एप्रिल रोजी पुढील सुनावणी ठेवल्याचे सांगितले.
या प्रकरणी काका साठे यांचे वकिल एडवोकेट उमेश मराठे बाबासाहेब जाधव एडवोकेट इंद्रजीत पाटील यांनी विरोधकांच्या तोंडी पुराव्याला विरोध करणारा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे अर्जावर ही 5 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी निर्णय घेतील. त्या सहा सदस्यांकडून एडवोकेट दत्ता घोडके एडवोकेट खराडे पाटील हे काम पाहत आहेत.



















