जॉईन फॉर पीस मल्टीपर्पज सोसायटी, सोलापूर. समाजातील दुर्बल घटकांच्या शैक्षणिक सामाजिक व आर्थिक विकासासाठी काम करीत आहे.त्याचबरोबर समाजातील विषमता नष्ट करून शांतता व सामाजिक सलोखा,राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
जॉईन फॉर पीस संस्था समाजात सामाजिक सलोखा निर्माण होवून शांतता व बंधूभाव निर्माण होण्यासाठी सध्या प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून २१ सप्टेंबर जागतिक शांतता दिनाचे औचित्य साधून समता बंधूता या तत्वांना प्रमाणित मानून मानवता,सामाजीक ऐक्य,शांतता व राष्ट्रीय एकत्मता जोपासण्याचे काम करणाऱ्या व्यक्तींना मागील चार वर्षापासून ” JP शांतता पुरस्कार २०२२” ने सन्मानीत करण्यात येत आहे.
या वर्षी पुरस्काराचे मानकरी म्हणून आमदार यशवंतराया गौडा, सुधीर खरटमल ( सामाजिक कार्यकर्ते ), हाजी मतीन बागवान ( सामाजिक कार्यकर्ते ), शाम पाटील ( सामाजिक कार्यकर्ते ) यांची निवड झालेली आहे.निवड झालेल्या मान्यवरांचा यथोचित गौरव करण्यात येणार असून सन्मानपत्र,गौरवचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या कार्यक्रमास शहारातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.समाजसेवक नजीर मुन्शी व मैनोद्दीन शेख यांच्या हस्ते जागतिक शांतता दिनी म्हणजेच बुधवार दिनांक २१ सप्टेंबर २०२२ रोजी संध्या. ७ वा.अचिव्हर्स हॉल नं. १,मध्ये निमंत्रितांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.अशी माहिती पुरस्कार निवड समितीने दिली आहे. या पुरस्काराची निवड झालेल्या मान्यवरांवर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



















