सोलापूर : रोहित पवार कोण? या आमदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्यानंतर सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच झोपली आहे राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान यांनी 2019 साली जर शहर मध्य मधून निवडणूक लढवली असती तर प्रणिती शिंदे या आमदार झाल्या नसत्या असे वक्तव्य केले आहे. त्या वक्तव्याला उत्तर देताना माजी युवक अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी जूबेर बागवान यांनी विजापूर वेस मधील मीना बाजार चा अध्यक्ष तर होऊन दाखवावे या शब्दात त्यांची खिल्ली उडवली आहे.

















