सोलापूर ः अक्कलकोट ते नळदुर्ग हा राष्ट्रीय महामार्ग क्र. 652 या रस्त्याचे काम सुरु असून संबंधीत शेतकर्यांची शेतजमिनीची मोजणी चुकीची झाली असून ती अगोदर जमिनीची मोजणी करा मगच रस्त्याचे काम सुरु करा या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समिती अक्कलकोट आणि शेतकर्यांच्या वतीने एक दिवशीय घंटानाद आंदोलन करण्यात आले. दरम्यान संघर्ष समितीचे दिलीप जोशी यांनी अधिक दिली.
यावेळी सदरसिंग ठाकूर, बाळासाहेब लोंढे पाटील, संतोष फडतरे, दिलीप जोशी, प्रशांत शिवगुडे, व्यंकट पाटील, महादेव बिराजदार, मारुती पाटील, भिमाशंकर म्हेत्रे, दयानंद लोहार, दयानंद कल्याणसेट्टी, दिलीप कलकोटे, काशिनाथ काले, शहाजी मोरे, रहिमान शेख आदी शेतकरी सहभागी झाले होते.


















