सोलापूर : जिल्हा परिषद स्थापनेला साठ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने या 60 वर्षाच्या कार्यकाळातील जिल्हा परिषद अध्यक्षांचा सत्कार तसेच आर आर (आबा) पाटील सुंदर ग्राम पुरस्कार आणि सोलापूर जिल्ह्यात यशस्वी काम केलेल्या ग्रामसेवकांना पुरस्कार देऊन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शुक्रवारी हुतात्मा स्मृती मंदिर येथे गौरविण्यात आले. यावेळी आपल्या भाषणात पालकमंत्री भरणे यांनी पुणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतानाचे अनुभव सांगितले. मी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष होतो, कारखान्याचा चेअरमन होतो, आता आमदार झालो मंत्री झालो परंतु जे समाधान जिल्हा परिषद अध्यक्ष असताना होते ते कुठेही मिळणार नाही असे सांगत उपस्थित माजी अध्यक्ष ग्रामसेवक जिल्हा परिषद प्रशासनाचे कौतुक केले…..

















