सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे हे पुन्हा एकदा पोलिसांशी भिडल्याचा प्रकार शासकीय विश्रामगृहासमोर घडला. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे मंत्री झाल्यानंतर प्रथमच सोलापूर दौऱ्यावर येत आहेत शासकीय विश्रामगृहावर ते बैठक घेणार असल्याने कार्यकर्त्यांनी त्यांच्या जंगी स्वागताची तयारी केली होती.
याठिकाणी जिल्हाप्रमुख मनीष काळजे हे उपस्थित होते त्यांच्या वतीने शासकीय विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारासमोर दोन्ही बाजूला स्वागताचे डिजिटल लावण्यात येत होते. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले डिजिटल लावण्यास मज्जाव केला तेव्हा मनीष काळजे हे थेट पोलिसांना भिडल्याचा प्रकार पाहायला मिळाला काय घडले नेमके यावेळेस पहा…



















