सोलापूर : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांचा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात हस्तक्षेप का? असा प्रश्न नवनिर्मित नर्सेस संघटनेने उपस्थित केला होता, त्यामुळे काळजे यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. एकीकडे असे असतानाच दुसरीकडे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने मनीष काळजे यांना एक पत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे. या पत्रात संघटनेने त्यांचे आभार व्यक्त करताना काही अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत. दरम्यान काळजे यांना दिलेले नेमके पत्र काय आहे पहा
आपण राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील सेवेतून कमी करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यातील ५९७ आरोग्य सेविकांची (सोलापूर जिल्हयातील ३३ आरोग्य सेविकांची) तात्पुरती सेवा कायम रहावी म्हणून महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री मा.ना. तानाजीराव सावंत यांचेकडे प्रयत्न करून या आरोग्य सेविकांच्या सेवा कायम ठेवणेसाठी आपण अतिशय परिश्रम घेवून विनामुल्य उत्तम कार्य केले आहे. मंत्री महोदय कार्तिक वारीच्या कार्यक्रमात व्यस्त असताना सुध्दा आपण त्यांना या आरोग्य सेविकांना तात्पुरत्या सेवेत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले आहे. मंत्री महोदयांकडून सकारात्मक निर्णय घेतला. त्याबददल मनःपूर्वक धन्यवाद.
या आरोग्य सेविकांचे इतरत्र समायोजन न होता त्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये कार्यरत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करावे. ही विनंती.
जिल्हा परिषद व हिवताप तसेच NHM याठिकाणी कार्यरत असलेल्या पुरुष व महिला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्येबाबत वेळोवळी सहकार्य करावे व या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्यास न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. ही विनंती.



















