सोलापूर : मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरविण्यात आले. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, माजी गृहमंत्री रमेश बागवे यांची प्रमुख उपस्थिती होती. मातंग एकता आंदोलनाचे जिल्हा युवक अध्यक्ष महेश लोंढे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी बोलताना आमदार शिंदे यांनी मातंग समाज आणि एकूणच अनुसूचित जातीच्या योजना त्यांचा निधी यावर भाष्य केले. अनेक योजना आहेत करोडोचा निधी येतो मात्र त्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाहीत, निधी परत जातो, समता दूत हे तर नावाला आहेत असे सांगत जयंती मिरवणुकीत एकत्र येता समाजाच्या प्रश्नावर का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला…पहा त्या काय म्हणाल्या…



















