सोलापूर : जड़ वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातावर कायमचा आळा घालण्याकरिता ५४ मीटर बायपास रस्ता व रिंग रोड करण्यात यावे. या मागणीकरीता सोलापुर शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासोबत शिष्ठमंडळाने सोमपा आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडे निवेदन देऊन केली.
यावेळी बोलताना चेतन नरोटे म्हणाले, सोलापुर शहरातील जड़ वाहतुकीमुळे आजपर्यंत शेकडो निष्पाप नागरिक मरण पावले. कित्येक जन कायमचे अपंग झाले. कोणाचे वडील, कोणाची आई, कोणाचा मुलगा मुलगी मरण पावले त्यामुळे त्या कुटुंबावर मोठ्ठा आघात झाला. अनेकांच्या घरातील कर्ता माणुस मरण पावल्यामुळे कुटुंबाची वाताहात झाली. या महिन्यात जवळपास ८ ते १० जण मरण पावले. शहरातील नागरिकांना आपले जीव मुठित घेऊन प्रवास करावा लागत आहे. या जड़ वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातावर कायमस्वरूपी तोड़गा म्हणून प्रलंबित ५४ मीटर रस्ता व रिंग रोड होणे शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टिने दोन्ही रस्ते होणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये प्रलंबित ५४ मीटर बायपास रस्त्याचे काम ४० टक्के महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंर्तगत झालेले आहे. सदरच्या ६० टक्के रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते उपाययोजना करून लवकरात लवकर हे दोन्ही रस्ते करून जड़ वाहतुकीस कायमचा आळा घालावा. यासाठी निधीची कमतरता भासल्यास शासनाकडे विशेष निधीची मागणी करणार असल्याचे सांगितले.
अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी सोलापुर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी शक्य तितक्या लवकर दोन्ही रस्ते करण्याचे आश्वासन दिले.
या शिष्ठमंडळात विनोद भोसले, अंबादास करगुळे, बसवराज म्हेत्रे, जेम्स जंगम, हाजिमलंग नदाफ, केशव इंगळे, महेश लोंढे, तिरुपती परकीपंडला, अनिल मस्के, कुणाल गायकवाड, दिनेश डोंगरे, नागेश गायकवाड़, रमेश वाकसे, लखन गायकवाड, सुभाष वाघमारे, रजाक कादरी, अप्पू शेख, सोमू कलबुर्गी, रोहन म्हेत्रे, अशोक दोड़मनी, चंद्रकांत नाईक, राजू कोरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


















