मंद्रुप – येथे इयत्ता ८ मध्ये शिकणाऱ्या चि.समर्थ जोडमोटे या बालचित्रकाराने महादेव कोगनुरे यांचे काढलेले पेन्सिल स्केच व्हाट्सअप द्वारे प्राप्त झाले होते, चि. समर्थ ह्या लहानश्या मुलाने बोटातील जादू कागदावर उतरली त्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे, इतके अप्रतिम चित्र काढल्याने चि. समर्थ ह्यास त्याच्या घरी जाऊन भेटून एम के फाऊंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांनी कौतुक केले व पेन्सिल स्केच स्वीकारले.
चि. समर्थ ह्याच्या शिक्षणात घराच्या परिस्थितीमुळे कोणताच अडथळा निर्माण होऊ नये यासाठी त्याचा इयत्ता नववी व दहावीचा शैक्षणिक खर्च उचलणार असल्याचे आणि त्याच्या भावी आयुष्यात शिक्षणासाठी शक्यतो सर्वतोपरी मदत करण्याचा शब्द उपस्थितांसमोर त्यांच्या कुटुंबाला महादेव कोगनुरे यांनी दिला.
लहान लहान मुले देखील आपल्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यातून प्रेरणा घेत आहेत. हे बघून करत असल्येल्या कार्याची एकप्रकारे पावतीच मिळाली आहे, ग्रामीण भागात फार टॅलेंट लपले आहे फक्त गरज आहे त्यांना शोधून जगासमोर आणण्याची व संधी देण्याची अश्यापैकीच एक म्हणजे चि.समर्थ असे प्रतिपादन एम के फाऊंडेशन चे संस्थापक महादेव कोगनुरे केले.
कोगनुरे साहेबांचे सामाजिक कार्य व समाजाप्रती असलेली तळमळ बघत असून त्यातूनच आपले चित्र काढायची प्रेरणा मिळाल्याचे चि. समर्थ याने याप्रसंगी सांगितले. यावेळी चि.समर्थ जोडमोटे व त्याचे कुटुंबीय, एम के फौंडेशनचे पदाधिकारी व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.