राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केले होते.
त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. त्यांचा सर्व स्तरातून निषेध नोंदवण्यात आला. पिंपरी चिंचवड येथे भीमसैनिकांनी त्यांच्या अंगावर शाई फेकली. ही शाई त्यांच्या चष्म्यावर पडली, त्यांचा डोळा वाचला.
यानंतर चंद्रकांत पाटील यांनी जाहीर माफी मागितली आहे. तरीही भीमसैनिकांमध्ये त्यांच्याबाबत रोष कायम आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी पुन्हा शाईफेकीची धमकी आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी खबरदारी म्हणून की काय फेसमास्क लावत पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसून आले आहे.





















