सोलापूर – माढा तालुक्यांतील आहेरगा येथील अजगर वस्ती येथे बालक तपासणीत समर्थ अमोल जोरकर या बालकाच्या हृदयात दोष आढळून आला. वेळेत उपचार घेतले मुळे बालकाचा जीव वाचला आहे. सिईओ दिलीप स्वामी यांनी सोलापूर जिल्ह्यात माझे मुल माझी जबाबदारी हे अभियान राबविले. या अभियानाची राज्यभर चर्चा झाली. शासनाने जागृत पालक व सुदृढ बालक अभियान सुरू केले. या अभियानाचा देखील शुभारंभ सिईओ दिलीप स्वामी यांनी नुकताच पंढरपूर तालुक्यांतील सिध्दवाडी येथे केला होता.
18 जानेवारी रोजी अंधारे हॉस्पिटल बार्शी येथे बालाजी हॉस्पिटल मुंबई यांनी आयोजित केलेले टू डी कॅम्प मध्ये तपासणी करण्यात आली होती. 8 फेब्रुवारी रोजी बालाजी हॉस्पिटल मुंबई येथे शस्त्र क्रिया करणेत आली. डाॅक्टर सातव यांनी प्रसंगावधान राखून डाॅक्टर सातव यांनी बालाजी हॉस्पिटल येथे तात्काळ शस्त्रक्रिया केली. यामुळे समर्थ या बालकांचे प्राण वाचणेस मदत झाली आहे.
जिल्ह्यात माझे मुल माझी जबाबदारी अभियान अंतर्गत सात लाख बालकाची कोरोना काळात तपासणी करणेत आली होती. माढा तालुक्यातील आरोग्य तपासणी मध्ये दोन हृदयविकाराची बालके आढळून आली सदर बालकांची तपासणी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे डॉक्टर सातव यांच्यामार्फत करण्यात आले. हृदयविकाराची तपासणी करण्याकामी त्यांना इतर मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले RBSK व ICDS विभाग मार्फत सदर बालकांच्या पालकांना त्यांच्या आरोग्याच्या स्थितीबाबत जाणीव करून देण्यात शस्त्रक्रिया पण पूर्ण करून घेऊन दोन्ही बालकाचे जीव वाचविण्यात आले.
माढा तालुक्यां तीन चार अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील दोन बालकांची जीव वाचलेला आहे. बालकांच्या शस्त्रक्रियाबाबत टेंभुर्णी प्रकल्पाचे बाल विकास अधिकारी श्री बालाजी अल्लडवाड यांनी सिईओ दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार काटेकोर पालन करून कार्यवाही केली त्यामुळे बालकाचे जीव वाचणेस मदत झाली आहे.
अभियानामुळे अनेक बालकांचे जीव वाचले – सीईओ स्वामी
……………….
माझे मुल माझी जबाबदारी या अभियानातून सर्व बालकांची आरोग्य तपासणी पूर्ण करून घेतली होती. त्यावर न थांबता बालकांच्या आरोग्य तपासणी बाबत बालमृत्यू उपजत मृत्यू माता मृत्यू बाबत अजूनही एक नवीन अभियान सुरू केले *जीवनाची हमी बालमृत्यू कमी* सदर अभियानाच्या माध्यमातूनही संदिग्ध असलेले बालके माता यांची काटेकोरपणे आरोग्य तपासणी करण्याबाबत महिला व बाल विकास विभाग व आरोग्य विभाग यांना सक्तीच्या सूचना दिल्या होत्या असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. तदनंतरही काही प्रमाणात बालमृत्यू होत असल्याचे बाब माझे निदर्शनास आली. यामध्ये पालकांचा सहभाग ही बाब महत्त्वाची आहे. असे लक्षात आले. त्यानंतर *जागरूक पालक व सुदृढ बालक* हा अभियान सुरू केले. सर्व अभियानाच्या माध्यमातून बालकांचा जीव वाचण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी महिला व बाल विकास विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.


















