सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा दोन दिवसांचा सोलापूर दौरा झाला. साहेबांच्या कन्या असल्याने या दौऱ्यात कार्यकर्ते खुश दिसून आले. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
सुप्रियाताईंची प्रेस असल्याने पत्रकारांची मोठी गर्दी होती. मुख्य खुर्चीच्या उजव्या बाजूला शहराचे अध्यक्ष भारत जाधव, त्यांच्या शेजारी प्रदेश सचिव संतोष पवार होते, डाव्या बाजूला पहिल्या खुर्चीवर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील आणि त्यांच्या शेजारी महेश गादेकर बसले होते.
सुप्रिया सुळे यांचे आगमन होताच सर्वजण उठले, त्यांच्या सोबत मोहोळचे आमदार यशवंत माने व जिल्हाध्यक्ष काका साठे होते. त्यांनी पत्रकार परिषद ज्याठिकाणी होती त्या हॉलचे स्वतः पडदे उघडले नंतर त्या आपल्या खुर्ची जवळ आल्या. त्यांनी महिला अध्यक्षांना पुढे बोलवा म्हणताच उमेश पाटील खुर्चीच्या बाजूला सरकले लगेच त्यांच्या खुर्चीवर आमदार माने यांना बसण्यास सांगितले. हे पाहून महेश गादेकर मात्र आपली खुर्ची सोडून मागे जाऊन बसले त्यांनी प्रोटोकॉल पाळला. त्यांच्या खुर्चीवर उमेश पाटील बसले. इकडे काका साठे यांना शहराध्यक्ष जाधव यांनी आपली खुर्ची देऊन मागची खुर्ची घेऊन ते त्यांच्या शेजारी बसले. काय घडले नेमके पहा हा व्हिडीओ….




















