सोलापूर : कास्ट्राईब जि.प. कर्मचारी संघटनेच्यावतीने संघटनेच्या कार्यालयांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशा. चंचल पाटील व मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, डॉ. बोरकर, पुणे आयुक्तालयाचे कक्ष अधिकारी राजेंद्र भालेराव, लेखाधिकारी दयानंद कोकरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर होते. सरचिटणीस संजय कांबळे, उपाध्यक्ष उमाकांत राजगुरू, चंद्रकांत होळकर, नरसिंह गायकवाड, नागसेन कांबळे, वैजिनाथ गायकवाड, ज्ञानेश्वर व्हटकर, , श्रीमती कांगरे, श्रीमती मोरे, योगेश कटकधोंड, नागनाथ धोत्रे, विलास मसलकर, मोहीत वाघमारे, अविनाश गोडसे, अनिल जगताप, संतोष जाधव, मकरंद बनसोडे, धनंजय जगताप, सुलाने, देविदास म्हेत्रे आदीसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास गुरव यांनी केले.



















