सोलापूर ! राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण महाराष्ट्रातील शहर व जिल्हाध्यक्ष यांच्या दिमतीला स्कॉर्पिओ हे वाहन दिले, यामुळे त्या पदाची शान वाढली, अध्यक्ष झालेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाहनांमुळे सोय झाली होती, सोलापूर शहर व जिल्ह्यात दोन वाहने देण्यात आली त्यावेळी शहरात बहुतेक स्वर्गीय कय्युम बुऱ्हाण व जिल्ह्यात मनोहर भाऊ डोंगरे हे अध्यक्ष होते, नंतर शहरात शंकर पाटील अध्यक्ष झाले, मनोहर सपाटे झाले, महेश गादेकर अध्यक्ष झाले, त्यांनी पक्षाची गाडी वापरल्याचे दिसले नाही पुढे भारत जाधव झाले,
सध्या शहरात भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार हे पक्षाकडून आलेली स्कॉर्पिओ गाडी वापरत आहेत, जिल्ह्यात मनोहर भाऊ नंतर माजी आमदार दीपक आबा साळुंखे हे अध्यक्ष झाले, गाडी त्यांच्याकडे गेली, साडेचार ते पाच वर्षानंतर आबांना काडून दुसऱ्या कार्यकर्त्याला अध्यक्ष करण्याचे ठरले,
उमेश पाटलांचे नाव आघाडीवर होते, जवळजवळ उमेशरावांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते मात्र जिल्ह्यातील काही नेत्यांनी विरोध केला, मनात नसतानाही जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या गळ्यात बळजबरीने अध्यक्षपद घालण्यात आले , आता काका साठे हे अध्यक्ष होऊन जवळपास दोन वर्षे होत आले आहेत, जिल्हाध्यक्षांची गाडी त्यांना पहायला सुद्धा मिळाली नाही, ते स्वतःची इनोव्हा गाडी वापरत आहेत,
याच पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाध्यक्ष काका साठे हे जिल्हाधिकारी कार्यालयात बसले होते, त्याचवेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई कार्यालयातून फोन आला , त्यांना गाडीची विचारणा झाली, मी कुठं वापरतोय, माझ्याकडं नाही गाडी,पूर्वीच्या जिल्हाध्यक्षांकडे आहे गाडी’ असे म्हणून काकांनी फोन बंद केला, यावरून दीपक आबांनी जिल्हाध्यक्षांची गाडी अजून पर्यंत आपल्याकडेच ठेवल्याचं दिसून येतंय,
खरे तर पक्षाने दिलेल्या गाडीच महत्व वेगळंच आहे, पक्षाची शान व प्रतिबिंब त्या गाडीतून दिसून येतं, एखाद्या मंत्र्यांच्या गाडी प्रमाणे रस्त्यावरून जाताना वाटते. सध्या राज्यात सत्ता असतानाही ग्रामीण भागात हे वाहन दिसत नाही हे दुर्दैव.


















