सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्या बद्दल मागील काही दिवसात डिजिटल मीडिया मध्ये माझं शरीर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असले तरी माझ्या मनात अजूनही काँग्रेस आहे अशा बातम्या आल्या. या बातम्या आल्याने खरटमल यांनी आपली बाजू मांडली, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ मिडियानी काढला आहे.
काही दिवसांपूर्वी जॉईन फॉर पीस मल्टीपर्पज सोसायटी, सोलापूर या संस्थेने मला यांना पुरस्कार देऊन गौरविले. याच कार्यक्रमात कर्नाटक काँग्रेसचे आमदार यशवंत गौडा पाटील यांना ही पुरस्कार देण्यात आला मात्र त्यांच्या ऐवजी त्यांचे चिरंजीव उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात मी काँग्रेस मध्ये असताना माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सोबत बऱ्याच वेळा गौडा पाटील यांच्या कडे गेल्याचे सांगितले, काँग्रेस पक्षात असताना मनापासून काम केले पक्ष वाढवला, त्यावेळी काँग्रेस माझ्या ह्रदयात होती, पण मी काँग्रेस का सोडली सगळ्या सोलापूरला माहिती आहे असे सांगताच समोर टाळ्यांचा कडकडाट झाला. असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
आता परत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदावर माझे नाव येत आहे. पण कुणाला काढून मला अध्यक्षपद नको आहे, राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पदासाठी प्रवेश केला नाही. पक्षावाढीसाठी आम्ही प्रामाणिक काम करत आहे, राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापूर महापालिकेत सत्तेत आणायचे हा आमचा अजेंडा आहे असेही खरटमल म्हणाले.



















