सोलापूर : काँग्रेसचे दिवंगत नेते धर्मा भोसले यांच्या 62 व्या जयंतीनिमित्त डॉक्टर एस आर रंगनाथन सार्वजनिक वाचनालय सोलापूर या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमास शिवछत्रपती पुरस्कार विजेते व ज्येष्ठ पत्रकार हाजी मलंग नदाफ यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर सकाळी साडे दहाच्या सुमारास रिमांड होम या ठिकाणी लहान मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला
या कार्यक्रमाला माजी नगरसेवक विनोद भोसले राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या लोलगे, सचिव तात्यासाहेब भोसले, रिमांड होमचे प्रमुख भगत सर, महेश घाडगे, चेतन चौधरी, श्रीकांत कोकितकर, गणेश डोंगरे, अमोल भोसले, धनंजय रोकडे , बसप्पा कोळी, यांच्यासह शिक्षक वर्ग व मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















