सोलापूर : कोण आहेत रोहित पवार? असा प्रश्न आमदार प्रणिती शिंदे यांनी माध्यमांसमोर केल्यानंतर सोलापुरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आता चांगलीच जुंपली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादीच्या युवक कार्यकर्त्यांनी शहरातील काँग्रेस भवन समोर रोहित पवार कोण आहेत? याचे माहिती देणारे मोठे पोस्टर आणून लावत जोरदार घोषणाबाजी केली होती.
त्यामुळे चौताळलेल्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला त्यांच्या स्टाईलने उत्तर दिले, आमदार प्रणिती शिंदे यांचे भले मोठे पोस्टर घोषणाबाजी करत महापौर निवासस्थानाच्या मागील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यालयासमोर नेऊन लावत जोरदार घोषणाबाजी केली आणि राष्ट्रवादीलाही आपल्या घोषणाबाजी मधून ‘आता कसं वाटतंय’ हा प्रश्न उपस्थित केला.

















