सोलापूर – सोलापूर शहर जिल्हा मोची समाजातील विविध विषयावर चर्चा करण्यासाठी सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आलेली बैठक उत्साही वातावरणात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अंबादास करगुळे होते. या बैठकीत सोलापूर शहर ताडीमुक्त करणे, धर्मांतर झालेल्यांना परत सन्मानाने समाजात आणने, स्व.करण म्हेत्रे यांच्या अंत्यविधीस गेलेल्या तरुणावर 353 कलम गुन्हा दाखल झालेल्यांचा रद्द करण्यासाठी प्रयत्न करणे, जातीचे दाखल्यासाठी 50 वर्षाचा पुरावाची अट शिथील करणे, मोची समाजाचे सुपुत्र स्व.बाबू जगजीवनराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी स्थानिक आमदारांचा सहकार्याने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन त्याचा पाठपुरवा करणे, अशा अनेक विषयावर चर्चा करण्यात आली.
यावेळी अंबादास करगुळे म्हणाले, ही बैठक घेण्याचा एकच उद्देश असून आपल्या मोची समाजातील अनेक समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याकरिता आपण सर्वजण एकत्र येण्याची गरज आहे. आतापर्यंत समाजातील नेत्यांनी अनेक प्रश्न व विविध समस्यावर लोकप्रतिनिधी किंवा शासकीय अधिकारी त्यांच्याकडून फक्त आश्वासन घेण्याचे काम केले आहे परंतु आपण असं न करता कुठल्याही समस्या सुटण्यासाठी निवेदन देऊन त्या संबंधित लोकांना भेटून शेवटपर्यंत त्याचा पाठपुरावा करणार आहे. बैठक ही कोणाच्या विरोधात किंवा कुणाचा तरी सन्मानात नसून आपल्या समाजातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याकरिता आपण सर्वजण काम करण्याची गरज आहे.
यावेळी मोची समाजातील ज्येष्ठ नेते बाबुराव संगेपाग, मारेप्पा कंपली, मारेप्पा फंदीलोलू, यल्लाप्पा तुपदोळकर, तम्मा विटे, सुनील म्हेत्रे, नरसिंग वल्लापोल्लू, चंद्रशेखर बोंतालेलु, राजु निलगंटी, भालचंद्र म्हेत्रे, संजू जंगडेकर, पांडू म्हेत्रे, भीमराव आसादे, रवी गोणे, प्रकाश आसादे, रमेश भंडारे, रवी म्हेत्रे, भिमराव मरेड्डी, अंबादास माढेकर, सिद्राम म्हेत्रे, मल्लुबाबा म्हेत्रे यांच्यासह लष्कर, बापुजी नगर, मोदी, मुस्लीम पाच्छापेठ, कोनापुरे चाळ, शेटे वस्ती, मधुकर उपलप वस्ती, थोरली इरणा वस्ती, धोडींबा वस्ती आदी भागातील बहुसंख्य जेष्ठ व युवक उपस्थित होते.


















