सोलापूर : ठाकरे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयाचे संपूर्ण महाराष्ट्रातून शिवप्रेमीनी स्वागत केले आहे. सोलापुरात संभाजी आरमार संघटनेच्या वतीने अध्यक्ष श्रीकांत डांगे व कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला….
दरम्यान संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे आभार व्यक्त करत या निर्णयाचे स्वागत केले…

















