सोलापूर – मनसे नेते आणि मनसे विध्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे शुक्रवारपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत. तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन ते या दौऱ्याची सुरवात करणार आहेत. मराठावाडा दौऱ्या पूर्वी सोलापुरात आले असता त्यांचे मनसे पदाधिकाऱ्यांनी भव्य जंगी स्वागत केले आहे.
दत्ता चौकातील सोन्या गणपतीचे अमित ठाकरे यांनी दर्शन घेतले यावेळी त्यांच्या हस्ते गणपतीची पूजा करण्यात आलीय.यावेळी दिलीप धोत्रे, विनायक महिंद्रकर, प्रशांत इंगळे, जैनुद्दीन शेख, अमर कुलकर्णी, गोविंद बंदपट्टे, अभि रंपुरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची पुनर्बंधणी करण्यासाठी त्यांचा हा दौरा असल्याचे अमित ठाकरे यांनी सांगितलं असून या दौरा आणि संघटत्नात्मक दौऱ्याची माहिती राज ठाकरे यांना सादर करण्यात येणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितलं असून दोन दसरा मेळाव्यावर प्रश्न विचारला असता मेळावे झालेत का मी नाही पाहिले असे म्हणून राजकीय विषयावर बोलणे टाळले..पहा काय म्हणाले ते….


















