दक्षिण सोलापूर : तालुक्यातील होटगी कुंभारी रोडवरील सोलापुरातील अष्ट विनायक मधील एका गणपती मूर्तीच्या डोळ्यातून पाणी गळत असल्याचा प्रकार समोर आला असून हे पाहण्यासाठी भाविक गर्दी करीत आहेत.
अष्ट विनायकापैकी एक असलेल्या बेनक गणपती च्या डोळ्यातून पाणी येत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. सोलापूर शहराच्या परिसरात अष्ट विनायक आहेत. त्यापैकी एक गणपती होटगी-कुंभारी रोडवर आहे. मंगळवारी भाविक जेव्हा दर्शनासाठी गेले तेव्हा गणपती मूर्तीच्या डाव्या डोळ्यातुन पाणी येत असल्याचे निदर्शनास आले. एका भाविकांने तो व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. हे दृश्य पाहण्यासाठी भाविकांमधून गर्दी केली जात आहे.


















