सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे नूतन संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांच्या उपस्थित सोलापूर शहर उत्तर विधानसभेची बैठक पार पडली. ह्यावेळी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, महिला आघाडी जिल्हा संघटिका अस्मिता गायकवाड, शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर, शहर उत्तर विधानसभा उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, माजी जिल्हा प्रमुख साईनाथराव अभंगराव, प्रा.अजित दासरी, रिक्षा सेना जिल्हाप्रमुख सुरेश जगताप, विद्यार्थी सेना जिल्हा युवाधिकारी लहू गायकवाड, युवासेना जिल्हा युवाधिकारी बालाजी चौगुले, युवती सेना जिल्हा युवाधिकारी पूजा खंदारे, उत्तर विधानसभा समन्वयक महेश धारशिवकर, आदींसह पदाधिकारी शिवसैनिकांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
सोलापूर शहर जिल्ह्यातील शिवसेनेच्या किल्ल्याच्या बुरुजालाही धक्का लागला नाही, 1966 ला ज्याप्रमाणे शिवसेना सुरू झाली त्या पद्धतीने शिवसेनेची वाटचाल येणाऱ्या काळात करायचे आहे. मी आपणाशी संवाद साधायला आलेला असून यापुढे सर्वसामान्य शिवसैनिकांची संपर्क असेल असा विश्वास नूतन जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना कोकीळ म्हणाले, 40 आमदारां पैकी 38 आमदार पडणार ही भविष्यवाणी केली असून ती खरी ठरेल आणि एकनाथ शिंदे यांना संन्यास घ्यावा लागेल.
यावेळी माजी जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे, साईनाथ अभंगराव, प्रा.अजित दासरी, उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, शहर प्रमुख गुरुशांत धुंत्तरगावकर, युवती सेना जिल्हा युवाअध्यक्ष पूजा खंदारे, अतुल भवर, यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. यावेळी आबा सावंत, बाळासाहेब गायकवाड, विजय पुकाळे, शार्दुल परदेशी, यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















