सोलापूर : बार्शी तालुक्यातील आर्यन शुगर थकीत एफआरपी प्रकरणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मंगळवारी बैठक बोलावली होती या बैठकीला बार्शीचे आमदार राजा राऊत, कारखाना विकत घेतला ते बजरंग सोनवणे, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी साखर आयुक्त कार्यालयातील सदस्य हे बैठकीला उपस्थित होते.
बैठकीनंतर आमदार राजेंद्र राऊत हे समाधानी दिसून आले पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, आर्यन साखर कारखान्याचा लिलाव होऊन तो कारखाना येडेश्वरी शुगरचे बजरंग सोनवणे यांनी घेतला आहे मात्र सन 2014-15 साली गाळप झालेल्या शेतकऱ्यांची 21 कोटी ची एफआरपी थकीत आहे. ती एफ आर पी शेतकऱ्यांना मिळावी यासाठी यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी तीन बैठका घेतल्या आहेत मात्र मंगळवारी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पाच जणांची समिती नेमली आहे. त्या समितीचे अध्यक्ष बार्शीचे तहसीलदार असतील या समितीच्या माध्यमातून कोण कोणत्या शेतकऱ्यांनी ऊस घातला त्यांच्या पावत्या जमा केल्या जाणार असून त्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आठ दिवसात एफआरपी दिली जाणार असल्याची माहिती दिली..



















