शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या काळजापूर मारुती येथील सिद्धलिला या निवासस्थानी मंगलमय वातावरणात ‘श्री’ची प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मातोश्री लिलावती देशमुख, माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, डॉक्टर उर्वर्षी देशमुख, क्रिशा देशमुख यांच्या हस्ते श्री ची पूजा करण्यात आली.
पुजारी योगेश स्वामी यांनी पौरोहित्य केल यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर शहर जिल्ह्य़ात मोठ्या भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा होत आहे, गेल्या दोन वर्षापासून गणेश भक्तांना गणेश उत्सव साजरा करण्याता आला नव्हता परंतु यावर्षी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी गणेश उत्सव साजरा करण्यासाठी सर्व नियमांना शिथिलता दिली त्यामुळे सर्व गणेश भक्तांनी शांततेत व उत्साह पूर्ण वातावरणात गणेश उत्सव साजरा करावा असं आवाहनही त्यांनी यावेळी गणेश भक्तांना केलं.
यावेळी उमेश कोळेकर, संतोष जम्मा, दयानंद वाघमारे, सुरेश पुप्पल आदी उपस्थित होते.




















