सोलापूर : पंढरपूरची आषाढी वारी दोन वर्षाच्या गॅप नंतर होत आहे. जिल्हा प्रशासन वारीसाठी झोकून काम करीत आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आपला संपूर्ण फोकस हा आषाढी वारीवर ठेवला आहे. दरम्यान आषाढी वारी संदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांची माध्यमांनी प्रतिक्रिया घेतली असता त्या म्हणाल्या..,
आम्ही अनुसूचित जाती कमिटीची बैठक सोलापुरात लावली होती मात्र जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आषाढी वारी असल्याने ती पुढे ढकलण्याची विनंती केली त्याला आम्ही मान्यता दिली कारण जिल्हा प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते आहे त्यांच्या या प्रतिक्रियेतून जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या कामाबाबत आमदार शिंदे यांनी समाधान व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं.

















