महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने २० मार्च रोजी होत असलेल्या मोर्चा आणि विधानसभा घेराव संदर्भात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस सोलापुर शहर युवक काँग्रेसचे प्रभारी आनंदकुमार दुबे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी काँग्रेस भवन येथे महत्वाची बैठक आयोजित केली होती.
यावेळी या मोर्चा व विधानसभा घेराव आंदोलनाबाबत माहिती देताना आनंदकुमार दुबे म्हणाले, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने २० मार्च रोजी देशामध्ये वाढलेली बेरोजगारी आणि महागाई, पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल दरवाढ, जुनी पेन्शन योजना, युवकांकड़े होणारा सरकारचे दुर्लक्ष, MPSC व विद्यार्थी आणि युवकांबद्दल सरकारची चुकीचे धोरणे, बेरोजगार युवकांना बेरोजगार भत्ता, आदिंच्या मागणीसाठी, केंद्र आणि राज्यातील खोके सरकारचा गलिच्छ कारभार या विरोधात मुंबई येथे लाखो युवकांचा मोर्चा काढून विधानसभेला घेराव घालण्यात येणार आहे. या आंदोलनात सोलापुर शहरातून जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.
यावेळी सोलापुर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी सांगितले की, मुंबईतील या युवक काँग्रेसच्या आंदोलनात सोलापुर शहरातून हजारोच्या संख्येने सहभागी होणार आहे.
या बैठकीस मध्य विधानसभा अध्यक्ष वाहिद विजापूरे, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष महेश जोकारे,महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रवीण जाधव, श्रीकांत वाडेकर, अनंत म्हेत्रे, माजी परिवहन सदस्य तिरुपती परकिपंडला, गणेश साळुंखे, सोशल मीडिया प्रमुख यासीन शेख, विवेक कन्ना, संजय गायकवाड, शरद गुमटे, सुनील सारंगी, सुभाष वाघमारे, किरण राठोड, धीरज खंदारे, समीर काझी, महेंद्र शिंदे, अजिंक्य पाटील, शशिकांत शेळके, सुरज कांबळे, बबलू जाधव, आदित्य म्हमाणे, आशुतोष वाले, मनोहर चकोलेकर, अजय जाधव, चंद्रकांत नाईक, गणेश देवसाने, सचिन घाटे व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















