सोलापूर : छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्त धर्मा भोसले सोशल फाउंडेशन तर्फे त्याच्यामध्ये इयत्ता नववी व दहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या शंभर विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरण कार्यक्रमाचे आयोजन हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या ॲम्फी थिएटर मध्ये करण्यात आले होते.
कार्यक्रमाला आमदार प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी, रावसाहेब पाटील, संयोजक विनोद भोसले यांची उपस्थिती होती. आपल्या भाषणात आमदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस पक्ष आता यापुढे इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण मोफत करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी जीवनातील पुस्तकाचे महत्व काय हे त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पटवून दिले, मला अजूनही स्वप्न पडतात….नक्की हा किस्सा काय होता पहा हा व्हिडीओ…