देशाचे नेते शरद पवार यांनी सुशीलकुमार शिंदे यांना हाताला धरून राजकारणात आणले. त्यांना आमदार होण्यापासून मुख्यमंत्री होण्यापर्यंत पाठिंबा दिला. त्याच पवार कुटुंबामुळे शिंदे कुटुंबाची ओळख निर्माण झाली त्यामुळेच प्रणिती शिंदे या आमदार झाल्या आणि आज त्याच पवार कुटुंबाला विसरत आहेत असे दिसतंय. स्वतः आमदार होताना काँगेस पक्ष संपवला. यांनी महेश कोठे, सिद्धाराम म्हेत्रे, दिलीप माने, बाळासाहेब शेळके, स्व. आनंद देवकते यांचे घराणे संपवण्याचा प्रयत्न सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून झाला आहे प्रणिती शिंदे स्वतः निवडून येण्यासाठी बाकीचे शेजारील मतदारसंघ भाजप पक्षाला घानखत करुन देतात. मागील महानगरपालिका निवडणुकीत भाजप सत्तेवर आणण्यासाठी प्रणिती शिंदे यांच्या कडून आघाडी तोडण्यात आली.
आमदार युवा नेते रोहित पवार यांच्याबाबत त्यांनी अनावधानाने वक्तव्य केलेले नसून पूर्णपणे जबाबदारीने आमदार शिंदे यांनी हे वक्तव्य केले आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहेत. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे त्या भाजपमध्ये जाणार असल्याचा या चर्चांना दूजोरा मिळत आहे. त्यांना भाजप मध्ये जायचं असेल तर त्यांनी खुशाल जावं. परंतु त्याची बंदूक राष्ट्रवादी पक्षावर ठेवू नये. महाविकास आघाडी म्हणून भाजपच्या विरोधात लढताना मित्र पक्षांमध्ये काही गैरसमज होत असतात परंतु प्रणिती शिंदे यांचे एकूणच वक्तव्य आणि त्यांचे धोरण पाहता ते भाजपमध्ये जातील का काय अशी शंका उपस्थित होते आहे.
प्रशांत बाबर
प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र.


















